मुख्य लढत : हेमंत पाटील (शिवसेना) विरुद्ध सुभाष वानखेडे (काँग्रेस)
गेल्या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या फेरीत काँग्रेसचे राजीव सातव १६३२ मतांनी विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे यांचा पराभव केला होता. तेच सुभाष वानखेडे यावेळी शिवसेना सोडून काँग्रेसचे उमेदवार आहे. विशेष म्हणजे सुभाष वानखेडे याच नावाचे अन्य पाच उमेदवार निवडणुकीत उभे आहे. सुभाष काशिबा वानखेडे, सुभाष मारोती वानखेडे, सुभाष विठ्ठल वानखेडे हे अपक्ष उमेदवार आहेत. तर सुभाष परशराम वानखेडे हे बहुजन महापार्टी, तर सुभाष नागोराव वानखेडे हे हम भारतीय पार्टीकडून निवडणुकीच्या मैदानात उभे आहे.
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.