मुख्य लढत : शिवसेना – हेमंत गोडसे विरुद्ध राष्ट्रवादी – समीर भुजबळ
यामध्ये शिवसेना विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे समीर भुजबळ असून समीर हे माजी खासदार आहे. तर नाशिक जिल्ह्यात भुजबळ यांचे वर्चस्व असल्याने ही निवडणूक अतितटीची होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.