WhatsApp, फेसबुक, इंस्टा डाऊन; नेटकरी त्रस्त

Webdunia
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (21:57 IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम जगभरात डाऊन झाले आहे. आज रात्री 9.15 च्या सुमारास, तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद अचानक बंद झाले होते. ज्यामुळे वापरकर्त्यांना खूप हैरान झाले होते. असे सांगितले जात आहे की भारतासह अनेक देशांमधील लोक या समस्येला सामोरे जात आहेत. यामुळे ट्विटरवर लोक सतत तक्रारी करत आहेत. तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्रुटी दर्शवत आहेत. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवताना किंवा रिसीव्ह करताना समस्या येत आहे, तर इन्स्टाग्राममध्येही पोस्ट पाहण्यात किंवा करण्यात समस्या येत आहे. या व्यतिरिक्त, फेसबुक पेज देखील लोड करण्यास होत नाहीये.

संबंधित माहिती

पुढील लेख