5G इंटरनेट सेवेसाठी स्पेक्ट्रम C बँडवर आधारित आहे जो स्पेक्ट्रमच्या 3.7-3.98 गीगाहर्ट्झ (GHz) श्रेणीमध्ये आहे. तर उड्डाण करताना विमानाची उंची मोजण्यासाठी वापरले जाणारे altimeters 4.2-4.4 GHz वर चालतात. एअरलाइन्सप्रमाणे 5G इंटरनेट सेवेसाठी निश्चित केलेले स्पेक्ट्रम बँड हे अल्टिमीटर ऑपरेट करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पेक्ट्रम बँडच्या आसपास असल्यामुळे अल्टिमीटरच्या अचूक ऑपरेशनमध्ये अडथळा येऊ शकतो.