इग्निट्रॉन मोटोकॉर्पने इलेक्ट्रिक डर्ट बाईक भारतात सादर केली

सोमवार, 17 जानेवारी 2022 (13:22 IST)
इग्निट्रॉन मोटोकॉर्प ने भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक डर्ट बाईक Bob-e  सादर केली आहे. इग्निट्रॉन मोटोकॉर्प प्रा. लि. ही एक भारतीय स्टार्टअप आहे जी कस्टमाईझ्ड  वाहनांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. या इलेक्ट्रिक मोटरसायकलचा लूक खूपच आकर्षक आहे आणि कंपनीचा दावा आहे की ती इको-फ्रेंडली तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे. इव्ही  निर्मात्याचा दावा आहे की सायबोर्ग बॉब-ई इलेक्ट्रिक मोटरसायकल आर्टिफिशियल इंटेलिजेंस-सक्षम तंत्रज्ञान आणि सुधारित सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. 
या बाइकला 2.88 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. कंपनीचा दावा आहे की ते एकदा  पूर्ण चार्जकेल्या  वर 110 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंजसह येते आणि याचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे. 
 
नवीन इलेक्ट्रिक बाईक लाँच करताना  इग्निट्रॉन मोटोकॉर्प प्रा. लि. संस्थापक, म्हणाले की, बॉब-ई  हे ब्रँड ग्राहकांसाठी एक संपूर्ण पॅकेज असेल जे आधुनिक तंत्रज्ञानासह कॉम्पॅक्ट आणि आरामदायी राइडिंगचा अनुभव शोधत आहेत. 
 
 ईव्ही स्टार्टअपचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक डर्ट बाईक तरुण पिढीच्या  ग्राहकांसाठी डिझाइन केली गेली आहे. ही काळा आणि लाल अशा दोन वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. इलेक्ट्रिक बाईकच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर त्याचे डिझाईन इतके वेगळे आहे की ती एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटात वापरलेल्या बाईकसारखी दिसते.
 
उत्तम वैशिष्ट्ये
ही इलेक्ट्रिक बाईक जिओफेन्सिंग, बॅटरी स्टेटस, यूएसबी चार्जिंग, ब्लूटूथ, कीलेस इग्निशन इत्यादी वैशिष्ट्यांनी सुसज्ज असल्याचा दावाही ईव्ही निर्मात्याने केला आहे. यात विविध प्रकारची माहिती दाखवणारे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन वेगवेगळे राइडिंग मोड मिळतात. यात रायडरच्या सोयीसाठी रिव्हर्स मोड आणि क्रूझ कंट्रोल देखील मिळतो.
 
बॅटरी आणि सस्पेंशन
वाहन निर्मात्याचा दावा आहे की त्यात वापरलेली लिथियम-आयन बॅटरी पोर्टेबल, वेदर प्रूफ आणि टच सेफ आहे. इग्निट्रॉनचा दावा आहे की बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर पाच तासाच्या बॅक अप देते . बाइक 15 amp फास्ट होम चार्जरसह येते. हे सुनिश्चित करते की 15 amp प्लग पॉइंट वापरून बाइक घरी चार्ज केली जाऊ शकते. इलेक्ट्रिक बाइकला त्याच्या सस्पेन्शन सेटअपद्वारे आरामदायी राइडिंगचा अनुभव देण्याचा दावा केला जातो ज्यामध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि रिअर  मध्ये  पूर्णपणे अॅडजस्टेबल मोनोशॉक अब्जावर्स समाविष्ट आहे .
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती