डिजिटल अटक म्हणजे काय आहे, लोक फसवणुकीला का बळी पडत आहे, जाणून घ्या

बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (13:17 IST)
सध्या सायबरच्या माध्यमातून ऑन लाईन पद्धतीने लोकांची फसवणूक केली जात आहे. फसवणुकीचा नवीन प्रकार डिझिटल अटकचे प्रकरण सध्या वाढत आहे. भोळे भाबडे नागरिक याला बळी पडत आहे. 

अखेर डिझिटल अटक म्हणजे काय आहे चला जाणून घेऊ या.
डिजिटल अटक ही सायबर फसवणुकीची एक नवीन पद्धत आहे. अशा प्रकरणांमध्ये, फसवणूक करणारे कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी असल्याची बतावणी करतात आणि ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल करून लोकांना घाबरवतात आणि अटकेच्या बहाण्याने त्यांना त्यांच्याच घरात डिजिटल ओलिस ठेवतात.

लोकांना म्हटले जाते की त्यांच्या नावाचे पार्सल सापडले असून त्यात अमली पदार्थसह आधारकार्ड आणि काही बँकांचे अकाउंट नम्बर आढळले आहे आणि तुमचा मोबाईल नंबर या अकाउंट्सशी संलग्न असून तुम्हाला गैरव्यवहाराची अटक केले जात आहे. किंवा तुम्ही मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात अडकला आहेत असे सांगून पैसे काढले जाते. 
 
खरं तर डिझिटल अरेस्ट असा कोणताच शब्द कायद्यात नाही. पण गुन्हेगारांच्या वाढत्या गुन्हामुळे हे शब्द उद्भवले आहे. या मध्ये एखाद्याला सीबीआय पोलीस ऑफिसर बनून त्याला सरकारी एंजसी ने अटक केली असून त्याला प्रकरणासाठी दंड भरावा लागणार आहे. अशा  परिस्थितीत नागरिक फसतात आणि त्यांना गुन्हेगार मागतील तेवढे पैसे देतात. नंतर आपली फसवणूक झाल्याचे समजते.अद्याप या प्रकरणात कोणतीही अटक झालेली नाही.फसवणूक करणारे नवीन सिम घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फसवणूक करतात.  
असे व्यवहार तुमच्या बँक खात्यातून झाले आहेत जे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. मनी लाँड्रिंग आणि एनडीपीएसचा धाक दाखवून बहुतेक शिक्षित आणि कायद्याची जाण असलेल्या लोकांना गोवले जाते. अशा

लोकांना घाबरवून त्यांच्याकडून डिजिटल माध्यमातून खंडणी मागितली जाते. त्यांच्या खात्यात पैसे नसल्यास त्यांना कर्ज दिले जाते. अनेक वेळा त्यांच्याकडे कर्ज घेणारी ॲप्स नसतात, त्यामुळे ती ॲप्स डाउनलोडही केली जातात. 
डिजिटल अटक म्हणजे काय 
* अटक करण्याची भीती दाखवत तुम्हाला घरातच ओलीस ठेवतात. 
* व्हिडीओ कॉल मध्ये ठिकाण पोलीस ठाणे असल्याचे भासवतात. 
* ऑनलाईन पाळत ठेवतात, कोण कुठे जात आहे.
* बॅंकचे खाते सीज करण्याची आणि अटक करण्याची धमकी देतात. 
*  ॲंप इंस्टाल करवून बनावटी डिझिटल फॉर्म भरवतात.
* डमी खाते सांगत त्यात पैसे जमा करायला लावतात. 

खरं तर कोणतीही सरकारी यंत्रणा सीबीआय,पोलीस,कस्टम,ईडी आणि न्यायालय आपल्याला व्हिडीओ कॉल वर अटक करू शकत नाही. या प्रकरणाशी संबंधित तक्रार आपण आपल्या सायबर ऑफिसात किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईट वर तक्रार नोंदवू शकता.किंवा 1930 या क्रमांकावर फसवणुकीची तक्रार करू शकता.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती