सावधान! आता १ लाख भारतीयांचे आधार, पॅन आणि पासपोर्टची विक्री इंटरनेटवर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गुरूवार, 4 जून 2020 (11:29 IST)
‘डार्क नेट’ (Dark Net)वर एक लाखाहून अधिक भारतीयांच्या इतर राष्ट्रीय ओळखपत्रांसह आधार, पॅनकार्ड (PAN Card) व पासपोर्ट (Passport) ची स्कॅन प्रत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सायबर सिक्युरिटी फर्म साइबल (Cyble) यांनी ही माहिती दिली आहे. साइबलच्या (Cyble) अहवालात म्हटले आहे की हे डेटा लीक एका थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून झाले आहे, सरकारी डेटाबेसमधून नाही.साधारणपणे तस्करी, दहशतवाद आणि इतर बेकायदेशीर कार्यांसाठी ह्या नेटचा वापर करण्यात येतो. कधीकधी याचा वापर संवेदनशील माहिती सामायिक करण्यासाठी देखील केला जातो.
 
काय आहे प्रकरण- डार्क वेबवरील माहितीवरून, अंदाज केला जाऊ शकतो की हा डेटा केवायसी (नो योअर कस्टमर) कंपनीमार्फत लिक झाला आहे, कारण डार्क वेबवर असलेल्या डेटामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्टची स्कॅन कॉपी समाविष्ट आहे.
 
डार्क नेट म्हणजे इंटरनेटचा तो भाग असतो जो सामान्य सामान्य सर्च इंजिनच्या आवाक्याबाहेर आहे. ते वापरण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची आवश्यकता पडते.
 
हे दस्तऐवज कसे लीक झाले - भारताच्या विविध भागांतील एक लाखाहून अधिक लोकांच्या ओळख कागदपत्रांवर प्रवेशाचा दावा करण्यात आला आहे. त्या वापरकर्त्याकडून सुमारे एक लाख ओळख कागदपत्रे मिळवून ते भारतीय असल्याची पुष्टी सायबलच्या संशोधकांनी केली आहे. हे सर्व कागदपत्रे स्कॅन कॉपी फॉर्ममध्ये आहेत. ते कदाचित कंपनीच्या 'तुमचा ग्राहक जाणून घ्या' डेटाबेसमधून चोरीला गेले असतील. तथापि, कंपनी  प्रकरणाचा तपास करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती