सध्याचा लॉकडाऊनच्या काळात भारतात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकरणे वाढतच आहेत. नुकतेच महाराष्ट्र सायबर सेलने एक चेतावणी दिली होती ज्यामध्ये त्यांनी लोकांना MONT BLANC कंपनी तर्फे आलेल्या मेसेज किंवा ई-मेलवर न जाण्याचा सल्ला दिला होता. आम्ही आपल्या सांगू इच्छितो आहोत की MONT BLANC ही एक पेनचे निर्माते आहे आणि या कंपनीच्या पेनची किंमत लाखोच्या घरात आहे.
* हॅकर्स प्रख्यात कंपनीच्या नावाचे वापर करतात:
हॅकर्स जगातील मोठ्या कंपनीच्या नावाचे वापर करून लोकांची फसवणूक करतात. जर का आपल्याला या नावाने कुठले ही ईमेल किंवा संकेत स्थळाची माहिती आली तर चुकूनही त्याला भेट देउ नका. इथे आपल्याला सांगू इच्छितो की कुठलीही कंपनी ग्राहकांना थेट संदेश किंवा ईमेल पाठवत नाही.
* आपली माहिती देउ नका:
अनेकदा हॅकर्स प्रख्यात कंपनीच्या नावाखाली फसवणूक करण्याच्या हेतूने ई मेल किंवा मेसेज पाठवतात. सावध राहा त्यांना आपली माहिती पासवर्ड, व्यक्तिगत डेटा, डेबिट आणि क्रेडिट कार्डाची माहिती पुरवू नका. असे केल्याने आपण स्वतःला फसविण्यापासून रोखू शकता. सावध राहणं ह्यातच शहाणपणा आहे.