भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोबाईल निर्मिती केंद्र

सोमवार, 1 जून 2020 (22:14 IST)
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोबाईल निर्मिती केंद्र ठरत असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. गेल्या पाच वर्षात, देशात २०० पेक्षा अधिक मोबाईल निर्मिती युनिट्स सुरु करण्यात आले आहेत. यासंदर्भात माहिती देणारं एक ग्राफिकल प्रेझेंटेशन सोशल मीडियाद्वारे त्यांनी  शेअर केलं आहे.
 
यानुसार, भारतात सन २०१४ च्या तुलनेत मोबाईल हँडसेट निर्मिती करणाऱ्या युनिट्समध्ये सन २०१९ मध्ये २०० टक्के वाढ झाली. यातील आलेखानुसार, २०१९-२० या आर्थिक वर्षात ३३० मिलियन (३ कोटी ३० लाख) मोबाईल फोन्सची निर्मिती करण्यात आली. या मोबाईल हँडसेट्सची एकूण किंमत सुमारे ३० मिलियन डॉलर इतकी आहे.
 
दरम्यान, प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमी इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन यांनी नुकतचं ट्विट करुन सांगितलं की, त्यांच्या कंपनीचे Mi आणि Redmi या ब्रँडचे ९९ टक्के स्मार्टफोन्स भारतातच तयार केले जात आहेत. याचे ६५ टक्के पार्ट्स देखील भारतातच तयार केले जात आहेत. अॅपलने यापूर्वीच Wistron and Foxconn या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर्सच्या सहकार्याने iPhone ची काही मॉडेल्स भारतातच तयार करण्यास सुरुवात केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती