Remove China Apps जोरात, रेटिंगही चांगले

सोमवार, 1 जून 2020 (22:07 IST)
भारतात चीनबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. यातून बहिष्कार घालायला सुरुवात केली आहे. चिनी अ‍ॅप्लिकेशन्स काढून टाकण्यासाठी अँड्रॉईडच्या गुगल प्ले स्टोअरवर ‘Remove China Apps’ हे अॅप लाँच करण्यात आलं आहे. हे अॅप जयपूर आधारित स्टार्टअपने लाँच केलं आहे. हे अॅप नावाप्रमाणे कार्य करते. हा अ‍ॅप वापरकर्त्याच्या स्मार्टफोनमधील स्थापित चीनी अॅप्स शोधतो आणि त्यांना अनइंस्टॉल करतो. सध्या, हा अॅप गुगल प्ले स्टोअरच्या विनामूल्य चार्टमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. या अ‍ॅप्लिकेशनलाही वापरकर्ते चांगले रेटिंग देत आहेत आणि सध्या त्याचे रेटिंग ४.८ आहे.
 
डाउनलोडबद्दल बोलताना, आतापर्यंत हे अॅप देशभरात १० लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केलं गेलं आहे. हा अ‍ॅप सध्या केवळ अँड्ड  स्मार्टफोनसाठी असून त्याचा आकार ३.५ एमबी आहे. त्याचा यूजर इंटरफेस सोपा आहे. स्कॅन हा एक चिनी अ‍ॅप पर्याय आहे जिथे चिनी अ‍ॅप्स टॅप करून शोधले जाऊ शकतात. अॅप शोधल्यानंतर, हे अॅप आपल्या फोनमध्ये प्रथम कोणते अॅप्स चीनी आहेत हे सांगेल. यानंतर, आपल्याकडून परवानगी घेतल्यानंतर हे अॅप ते चीनी अॅप्स अनइंस्टॉल करेल. हा अ‍ॅप १४ मे रोजी गुगल प्ले स्टोअरवर अपलोड करण्यात आला होता आणि दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत हा अॅप भारतात लोकप्रिय झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती