आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यातील 70 वा आणि शेवटचा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार होता. मात्र, पावसामुळे एकही चेंडू न खेळता सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांच्या खात्यात आता प्रत्येकी एक गुण आहे.
पावसामुळे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. दोन्ही संघांच्या खात्यात आता प्रत्येकी एक गुण आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना 21 मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.
दरम्यान, 22 मे रोजी एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. यानंतर क्वालिफायर-2 चेन्नईत 24 मे रोजी होणार आहे. क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर जिंकणारा संघ यांच्यात हा सामना खेळला जाईल. 26 मे रोजी क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 मधील विजेत्या संघांमध्ये चेपॉक येथे अंतिम सामना खेळवला जाईल.