मंगळवारपासून प्लेऑफला सुरुवात होईल. दुसऱ्या स्थानासाठीच्या लढाईत सनरायझर्सने आपला सामना जिंकला आहे. आता त्यांना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजच्या दुसऱ्या सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जर कोलकाता संघ हरला किंवा हा सामना पावसाने वाहून गेला, तर सनरायझर्स संघ साखळी फेरीत दुसरे स्थान मिळवून प्लेऑफसाठी पात्र ठरेल.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने पाच गडी गमावून 214 धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने 45 चेंडूत 71 धावा, रिले रुसोने 24 चेंडूत 49 धावा आणि अथर्व तायडेने 27 चेंडूत 46 धावा केल्या. प्रत्युत्तरात अभिषेक शर्माच्या 28 चेंडूंत66 धावा आणि हेनरिक क्लासेनच्या 26 चेंडूंत42 धावांच्या जोरावर हैदराबादने 19.1 षटकांत 215 धावांचे लक्ष्य सहा गडी गमावून पूर्ण केले.