RCB vs GT: विराट कोहलीचा नवा IPL मध्ये नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Webdunia
रविवार, 5 मे 2024 (10:05 IST)
IPL 2024 चा 52 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात विराटची शानदार खेळी पाहायला मिळाली. त्याने आयपीएलच्या सामन्यात नवा विक्रम केला.

विराटने या सामन्यात 27 चेंडूंवर 42 धावांची खेळी खेळली. त्याने या खेळीत 2 चौकार, आणि 4 षटकार मारले. या खेळीमुळे आरसीबीने 4 गडी राखून विजय मिळवला. 
विराटने या आयपीएलच्या विजयी सामन्यात 4000 धावा पूर्ण केल्या. असा करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. या आधी कोणता खेळाडू असे करू शकला नाही. 
 
या डावात विराट कोहलीने आपल्या T20 कारकिर्दीत 12500 धावांचा आकडाही गाठला. T20 क्रिकेटमध्ये 12500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी केवळ ख्रिस गेल, शोएब मलिक आणि किरॉन पोलार्ड यांनी ही कामगिरी केली होती. T 20 क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट चौथ्या स्थानावर आहे. T20 क्रिकेट मध्ये त्याने 12536 धावा केल्या आहे.
 
Edited By- Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख