IPL 2023: जसप्रीत बुमराहच्या जागी मुंबई इंडियन्स संघात या गोलंदाजाचा समावेश

Webdunia
शनिवार, 1 एप्रिल 2023 (09:59 IST)
आयपीएल 2023 चे सामने सुरु झाले आहे. पहिला सामना चेन्नई आणि गुजरातच्या मध्ये झाला. आयपीएलच्या 16व्या हंगामात अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे अर्धा हंगाम मुकणार आहेत. या खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्सचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे. मुंबईने बुमराहच्या जागी खेळाडूची घोषणा केली आहे.
 
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 साठी जसप्रीत बुमराहच्या जागी संदीप वॉरियरला करारबद्ध केले आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराहच्या जागी खेळणार आहे.
 
2021 मध्ये भारताकडून पदार्पण करणारा संदीप देशांतर्गत स्पर्धेतील अनुभवी खेळाडू आहे. संदीपने टी-20 फॉरमॅटमध्ये 69 पैकी 200 हून अधिक सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 362 विकेट घेतल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यापूर्वी संदीप मुंबई इंडियन्समध्ये सामील होईल.
 
 31 वर्षीय संदीप आयपीएलमध्ये आरसीबी आणि केकेआरचा भाग आहे. त्याच्या नावावर आयपीएल लीगमधील 5 सामन्यात 2 विकेट आहेत. भारताकडून खेळलेल्या एकमेव सामन्यात त्याला यश मिळाले नाही. संदीप वारियरने 2012 मध्ये केरळकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता तो तामिळनाडूकडून खेळतो. त्याने 68 टी-20 सामन्यात 62 विकेट्स घेतल्या आहेत. 69 लिस्ट ए मॅचेसमध्ये 83 विकेट्स आणि 66 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 217 विकेट घेतल्या आहेत.
 
मुंबई इंडियन्स संघ
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, पियुष चावला, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रुईस, जोफ्रा आर्चर, संदीप वॉरियर, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, नेहल वधेरा , राघव गोयल, झ्ये रिचर्डसन, आकाश मधवाल, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, ड्वेन जॉन्सन, विष्णू विनोद, शम्स मुलानी
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख