IPL : 52 दिवस, 10 संघ, 74 सामने, जाणून घ्या कोण आहे कुठल्या संघात...
शुक्रवार, 31 मार्च 2023 (16:06 IST)
31 मार्च 2023 पासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 13 टीम्स खेळणार आहेत. त्यात दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू, पंजाब किंग्स, सनराइजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स और गुजरात टायटन्स.
यावेळी एकूण 74 मॅच खेळल्या जाणार आहेत. त्यापैकी 70 लीग मॅच आणि 4 प्लेऑफ होणार आहेत.
अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदाराबाद, बेंगलुरु, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला अशा एकूण 12 शहरांमध्ये यंदाच्या मॅचेस होणार आहेत.
लीग मॅचमध्ये सर्व टीम्स एकूण 14 मॅच खेळतील. त्यापैकी 7 त्यांच्या होम स्टेडिअमवर होतील तर उरलेल्या 7 मॅचेस प्रतिस्पर्धी टीमच्या होम ग्राउंडवर होतील.
त्यानंतर 24 ते 27 मे प्लेऑफ मॅच होतील. तर 29 मे रोजी आयपीएलची फायनल खेळली जाणार आहे.
कुठल्या टीमकडून यंदा कुठले खेळाडू मैदानात उतरणार आहेत यावर एक नजर टाकूया.
गुजरात टायटन्स
कॅप्टन - हार्दिक पंड्या
कोच - आशीष नेहरा
होम ग्राउंड - नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद
टीम - हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, मोहम्मद शमी, राशिद ख़ान, राहुल तेवतिया, शिवम मावी, मैथ्यू वेड, केन विलियम्सन, रिद्धिमान साहा, जयंत यादव, विजय शंकर, के.एस. भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर. साई किशोर, अभिनव सदरंगानी, अव्जारी जोसेफ, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे आणि साई सुदर्शन.