IPL 2023 :TV वरील पहिल्या IPL सामन्याला मिळाले 40 टक्के कमी जाहिरातदार, डिजिटलने केली मोठी खळबळ

रविवार, 9 एप्रिल 2023 (15:44 IST)
टीव्हीवरील पहिल्या सामन्यात जाहिरातदार 52 वरून 31 पर्यंत कमी झाले
 एकूण टीव्ही प्रायोजक देखील 16 वरून 12 वर आले आहेत
 125 पेक्षा जास्त एस्क्ल्युसिव्ह जाहिरातदारांसह डिजिटल भागीदार
 
नवी दिल्ली, 09 एप्रिल 2023: आयपीएलमध्ये एक नवीन ट्रेंड उदयास आला आहे. जाहिरातदार टीव्ही सोडून डिजिटलकडे वळत आहेत. बीएआरसी इंडियाच्या टीव्ही रेटिंगमध्ये, जिथे गेल्या वर्षी पहिल्या सामन्यात सुमारे 52 जाहिरातदारांनी टीव्हीवर जाहिराती दिल्या होत्या. आणि या वर्षी फक्त 31 जाहिरातदार दिसले. म्हणजेच 40 टक्के जाहिरातदारांनी टीव्ही प्रसारणाकडे पाठ फिरवली आहे.
 
गेल्या आयपीएल हंगामात टीव्ही जाहिरातदारांची संख्या 100 च्या आसपास होती. यंदा  टीव्ही100 जाहिरातदारांच्या आकड्याला स्पर्श करू शकेल, हे फार कठीण वाटते. टीव्हीवरील प्रायोजकांची संख्याही कमी झाली आहे, गेल्या वर्षी 16 वरून यावर्षी 12 वर आली आहे. या 12 पैकी एक प्रायोजक तिसऱ्या सामन्याशीही जुडलेला आहे.
 
रिलायन्सशी संबंधित कंपन्या जाहिरातदारांच्या यादीतून पूर्णपणे गायब आहेत. कारण आहे रिलायन्स ग्रुपची कंपनी वायाकॉम-18, ज्याला आयपीएलचे डिजिटल प्रसारण अधिकार मिळाले आहेत. सोडलेल्या इतर मोठ्या टीव्ही जाहिरातदारांमध्ये बायजूस, क्रेड, मुथूट, नेटमेड्स, स्विगी, फ्लिपकार्ट, फोन पे, मीशो, सैमसंग, वनप्लस, वेदांतु, स्पॉटिफाई आणि  हैवेल्स यांचा समावेश आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क भारतात टीव्हीवर आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण करत आहे.
 
डिजिटलने टीव्ही जाहिरात कमाईचा एक मोठा भाग हस्तगत केला आहे. 125 हून अधिक जाहिरातदारांनी टीव्हीला मागे टाकून डिजिटल जाहिरातींसाठी वायकॉम-18 शी करार केला आहे. यामध्ये अमेजन, फोनपे, सैमसंग, जियोमार्ट, यूबी, टीवीएस, कैस्ट्रोल, ईटी मनी, प्यूमा, आजियो या कंपन्यांचा समावेश आहे. टीव्हीवर जाहिरातदार कमी होत आहेत, साहजिकच याचा थेट परिणाम टीव्ही ब्रॉडकास्टरच्या कमाईवरही होईल. आयपीएलच्या कमाईचे संपूर्ण आकडे समोर यायला अजून वेळ आहे, जसजसे आयपीएल पुढे जाईल तसतसे चित्र अधिक स्पष्ट होईल.
 
भारतात वायकॉम-18 IPL 2023 चे सामने जिओ सिनेमा अॅपवर लाइव्ह स्ट्रीम करत आहे. एकूण 20,500 कोटी रुपयांना, वायकॉम-18  ने भारतातील सामन्यांच्या डिजिटल लाईव्ह स्ट्रीमचे हक्क विकत घेतले होते. जिओ सदस्यांसह सर्व दूरसंचार प्रदात्यांचे वापरकर्ते जिओ सिनेमा अॅपमध्ये विनामूल्य लॉग इन करून IPL सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.
 
Edited By - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती