DC Vs RR : इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 11 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुवाहाटी येथे खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात केली.
जोस बटलरचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. त्याने 32 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. बटलरने आतापर्यंत सात चौकार आणि एक षटकार मारला आहे.
यशस्वी जैस्वाल 31 चेंडूत 60 धावा करून बाद झाला आहे. मुकेश कुमारने त्याच्याच चेंडूवर झेल घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जैस्वालने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला.यशस्वी जैस्वालने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंतच्या खेळीत 11 चौकार मारले आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे राजस्थान संघाने एकही विकेट न गमावता 80 धावांचा टप्पा पार केला.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर ही सलामीची जोडीने गुवाहाटीत हल्लाबोल केला.