भारताच्या कारवाईचा प्रभाव, पाकिस्तानमध्ये 180 रुपये किलो टोमॅटो

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील लोकांमध्ये आक्रोश आहे. आता देशातील शेतकरी आपला दम दाखवत आहे. भारती शेतकर्‍यांनी आपले उत्पाद पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भाज्या आणि फळं सडल्यामुळे फेकावे लागले तरी हरकत नाही तरी पाकिस्तानात पाठवल्या जाणार नाही.
 
मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांनी आपले टोमॅटो पाकिस्तानात पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. उल्लेखनीय आहे की पाकिस्तानला सर्वात अधिक फळं आणि भाज्या आजादपुर मंडीहून सप्लाय केल्या जातात पण आता तेथील व्यापार्‍यांनी देखील आपले उत्पाद पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे.
 
भारत सरकारने देखील कारवाई करत पाकिस्तान निर्यात करण्यात येणार्‍या उत्पादांवर बेसिक कस्टम ड्यूटी 200 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. परिणामस्वरूप पाकमध्ये भाज्यांची किंमत उंचावली आहे.
 
भारतात टोमॅटो 10 रुपये किलो मिळत आहे तेच टोमॅटो पाकिस्तानच्या लाहोरमध्ये 180 रुपये किलो पर्यंत पोहचले आहेत. टोमॅटो व्यतिरिक्त कांदे व इतर भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. 
 
सूत्रांप्रमाणे पाकिस्तानात बटाटे 30-35 रुपये किलो, काकडी 80 रुपये किलो, दुधी भोपळा आणि तिंदे 60-80 रुपये किलो, शिमला मिरची 80 रुपये किलो आणि भेंडी 120 रुपये किलो पर्यंत मिळत आहे. उल्लेखनीय आहे की पाकिस्तानच्या भाजी मार्केटमध्ये अशी वृद्धी वर्ष 2017 मध्ये देखील बघण्यात आली होती. दोन्ही देशांमध्ये वाढत असलेल्या ताणामुळे आपूर्ती बंद करण्यात आली होती, ज्यामुळे पाकिस्तानात टोमॅटोची किंमत 300 रुपये किलो पर्यंत पोहचली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती