तालिबानने काबूलवर काबीज केल्यापासून अफगाणिस्तानातील सामान्य लोक पाकिस्तानचा सातत्याने विरोध करत आहेत.काबुलच्या रस्त्यावर लोक पाकिस्तान मुर्दाबाद,आझादी आणि समर्थन पंजशीरच्या घोषणा देत आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार,अफगाणिस्तानातील लोक पाकिस्तान समर्थित दहशतवादाचा विरोध करत आहेत.निषेध करताना हे लोक काबूलमधील पाकिस्तान दूतावासातही पोहोचले जेथे त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत.एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार,तालिबान्यांनी या विरोध करणाऱ्या लोकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला आहे.
स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, हजारो महिला आणि पुरुष निदर्शने करत आहेत. हे लोक म्हणतात की अफगाणिस्तानला स्वतंत्र सरकार हवे आहे पाकिस्तानी कठपुतळी सरकार नाही. लोक पाकिस्तान,अफगाणिस्तान सोडा अशा घोषणा देत आहेत.
पाकिस्तानवर तालिबानचे समर्थन केल्याचा आरोप आहे. अफगाणिस्तान सरकारला अस्थिर करून पाकिस्तान तालिबानशी सहकार्य करत आहे याचे पुरावे अनेक माध्यमांच्या अहवालांनी सादर केले आहेत. अफगाणिस्तान आणि अमेरिकेबरोबर वर्षानुवर्षे चाललेल्या युद्धात पाकिस्तान हा एकमेव देश आहे जो तालिबानचा समर्थक आहे. तालिबानने सातत्याने पाकिस्तानला आपले दुसरे घर म्हटले आहे. अलीकडेच, पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री म्हणाले होते की पाकिस्तान तालिबानचा 'संरक्षक' आहे आणि त्यांनी बराच काळ त्यांची काळजी घेतली आहे. तालिबान राजवटीला मान्यता देणारा पाकिस्तान हा पहिला देश असू शकतो.