खैबर पख्तूनख्वामध्ये स्फोटात एका मुलाचा मृत्यू, 25 पोलीस जखमी

शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (11:35 IST)
पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका पोलिस स्टेशनमध्ये एक मोठा स्फोट झाला , ज्यामध्ये एक बालक ठार झाला आणि सुमारे 25 पोलिस जखमी झाले. पेशावरपासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वाबी पोलिस स्टेशनमध्ये ही घटना घडली.

पाकिस्तान केंद्रीय पोलिस कार्यालयाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार, पोलिस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरील डेपोमध्ये 'शॉर्ट सर्किटमुळे' हा स्फोट झाला. बचाव आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठले आणि जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल केले नेले. या ठिकाणी आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोटामुळे इमारतीचा वरचा भाग कोसळला आहे'. या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्फोट इतका जोरदार होता की इमारतीला आग लागली.आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.पोलीस स्टेशनवर झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला नव्हता. असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती