मिकी माऊस आणि मिनी माऊस ही शंभर वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली कार्टून पात्रे अद्यापही लोकप्रिय असून आता ही पात्रे कॉपीराइटच्या बंधनातून मुक्त झाली आहेत.अमेरिकेतील कायद्यानुसार डिस्नेच्या या लाडक्या पात्रांवरील खासगी हक्क संपुष्टात आला असून आता त्यांचा इतरांनाही वापर करता येणार आहे.
डिस्रेने 1928 मध्ये स्टीमबोट विली या लघुपटाद्वारे मिकी माऊस आणि मिनी माऊस ही पात्रे सर्वप्रथम सादर केली होती.
या दोन्ही पात्रांची ही पहिली आवृत्ती मागील महिन्यात, म्हणजे 95 वर्षांनंतर कॉपीराइटमधून मुक्त झाली आहेत. त्यामुळे मिकी माऊसच्या या आवृत्तीचा वापर करण्यासाठी आता कोणाच्याही परवानगीची गरज नाही. या पात्राच्या नंतर सुधारित आवृत्त्याही तयार करण्यात आल्या. त्यांच्यावर मात्र अद्यापही डिस्रेचा हक्क असून त्यांचा वापर करण्यासाठी त्यांची परवानगी आवश्यक आहे.
याशिवाय डिस्रेचीच प्लुटो आणि डोनाल्ड डक ही पात्रेही लवकरच बंधमुक्त होणार आहेत. ही पात्रे आता सर्वांना हव्या त्या स्वरुपात वापरता येणार आहेत. नाईटमेअर फोर्ज या व्हिडिओगेम विकसित करणा-या कंपनीने त्यांच्या एका गेममध्ये स्टीमबोल विली हा मिकी माऊस खेळाडूंना मारत असल्याचे दाखविले आहे.