इराकमध्ये मुलींच्या लग्नाचे वय 9 वर्षे करण्यात यावे. असा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आले आहे. मात्र, या प्रस्तावाला विरोदही वाढू लागला आहे. सध्या इराकमध्ये मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षे आहे. कायद्याने त्याला मान्यता देण्यात आली आहे, पण नवीन प्रस्तावानुसार हे वय 9 वर्षे करण्यात आले आहे. मात्र, काही संघटनांनी यास विरोध केला आहे. या निर्णयामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. तसेच कोवळ्या वयात मुलींचे लग्न झाल्याने त्यांच्यावर विविध प्रकारे होणारे अन्याय अजाणतेपणात सहन करावे लागतील, असे मत या संघटानांनी व्यक्त केले आहे.