शिर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी भविष्यातील नवीन उपचाराने सर्व अचंबित

शनिवार, 18 नोव्हेंबर 2017 (16:31 IST)

विज्ञान आणि तंत्रज्ञान काय चमत्कार करेल हे सांगणे फारच अवघड आहे. यामध्ये रोज नवीन शोध लावले जातात. याचाच एक भाग म्हणून शिर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी  करण्यातआली आहे. त्यामुळे भविष्य वेगळे असणार हे मात्र नक्की झाले आहे. आपण आज किंवा मागील काही दिवसांत हृद्य प्रत्यारोपण, किडनी, लिव्हर, डोळे , स्कीन  अशाप्रकारचे अवयव प्रत्यारोपण झाल्याचे पाहत आहोत अनेकांना यामुळे जीवनदान मिळाले आहे. पण आता ही किमया डोक्याच्या अर्थात शिर  प्रत्यारोपणापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे उपचाराची नवीन दलाने उघडी झाली आहेत. यामध्ये डॉक्टर यांनी त्यांच्या टीमने  १८ तास अथक  प्रयत्न करत  जगात पहिल्यांदा ब्रेन डेड व्यक्तीवर डोकं प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. यामध्ये इटाली येथील प्रसिद्ध  सर्जन सर्गिओ कॅनावेरो यांनी शिर  प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण  केली आहे. आता लवकरच ही शस्त्रक्रिया जीवंत व्यक्तीवर करणार असल्याचा त्यांनी सागितले आहे. मात्र जिवंत व्यक्ति हे अजूनतरी सहन करू शकणार नाही त्यामुळे यामध्ये अजून अनेक वर्ष जावी लागणार असून लवकरच मोठा चमत्कार घडेल अशी अपेक्षा डॉक्टर करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती