पाकिस्तानात आर्थिक संकट, 22 जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा खंडित

सोमवार, 23 जानेवारी 2023 (12:18 IST)
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पाकिस्तानमध्ये सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे . सध्या देशातील इस्लामाबाद, कराची आणि पेशावर भागातील 22 जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला आहे.  दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. लवकरच पुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,शनल ग्रीडमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही वीजपुरवठा खंडित झाली आहे. 
 
सोमवारी सकाळी ७.३४ वाजता नॅशनल ग्रीड सिस्टीममध्ये हा बिघाड झाला.पाकिस्तान मंत्रालयाच्या वक्तव्यापूर्वीच तेथील अनेक कंपन्यांनी सोशल मीडियावर लोकांना वीज बिघाडाबद्दल सांगण्यास सुरुवात केली होती. 
 
क्वेटा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी (QESCO) च्या म्हणण्यानुसार, सिंधच्या गुड्डू भागातून क्वेट्टाला जाणाऱ्या दोन ट्रान्समिशन लाईन ट्रिप झाल्या. त्यामुळे क्वेटासह बलुचिस्तानमधील 22 जिल्ह्यांमध्ये विजेचे संकट निर्माण झाले आहे. कराचीतील अनेक भागात वीजही बिघडली आहे. 
 
पाकिस्तान वीज संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानच्या नॅशनल इलेक्ट्रिक पॉवर रेग्युलेटरी ऑथॉरिटीने कराची शहरातील विजेच्या दरात प्रति युनिट 3.30 रुपयांची वाढ केली होती. याशिवाय विविध ग्राहक  विविध ग्राहक श्रेणींसाठी वीज दरात 1.49 रुपयांवरून 4.46 रुपये प्रति युनिटपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 
नवीन दर लागू झाल्यानंतर ग्राहकांना 43 रुपये प्रति युनिट दराने वीज मिळत आहे.  
पाकिस्तानी जनतेसाठी प्रत्येक सकाळ एक नवे आव्हान घेऊन येत आहे. दुसरीकडे  सरकार जनतेला धक्के देत आहे.
 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती