पॉलिनेशियामधील टोंगा या बेट देशाला 7.1 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. यामुळे हवामान खात्याने या पॅसिफिक बेट देशात त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. या संदर्भात, अमेरिकन एजन्सी - यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की, भूकंप सोमवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार, मुख्य बेटापासून सुमारे 100 किलोमीटर (62 मैल) ईशान्येस झाला. सध्या, कोणत्याही जीवितहानीबद्दलचे वृत्त नाही.
टोंगाची भौगोलिक स्थिती संवेदनशील आहे. या पॉलिनेशियन देशात 171 बेटे आहेत. येथील लोकसंख्या 1,00,000 पेक्षा थोडी जास्त आहे. बहुतेक लोक टोंगाटापूच्या मुख्य बेटावर राहतात.