अमेरिकेच्या दबावामुळे संपूर्ण जगाचं नुकसान, चीनचा इशारा

गुरूवार, 9 जुलै 2020 (12:44 IST)
अमेरिका सर्व देशांना चीनविरुद्ध भडकवत असून स्वत:च्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेच्या या वाढत असलेल्या दबावामुळे संपूर्ण जगाचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा इशारा चीनकडून मिळत आहे. चिनी मीडियाद्वारे ही बातमी समोर येत आहे. 
 
चीनचा प्रादेशिक वाद असणार्‍या देशांना अमेरिका पाठिंबा देत आहे तसेच पाश्चात्य आणि आशियाई देशांना चीनविरोधात भडकवत आहे. अमेरिका आपला प्रभाव वाढवत असल्याचं परिणाम सर्वांना भुगतावा लागेल. 
 
वृत्ताप्रमाणे चीनने म्हटले की चीनचा बाजार अमेरिकेच्या बरोबरीचा असून जवळपास 100 देशांशी चीनचे व्यापार संबंध आहेत, परंतु अमेरिका हे संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे ज्याची मोठी किंमत मोजावी लागेल.
 
कोरोना व्हायरसमुळे जगाला मोठं नुकसान झेलावं लागणार आहे. ही तर कोविड साथीच्या रोगाची पहिलीच लाट आहे असेही चीनने म्हटले. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय मदत बंद केली आहे. अमेरिकेच्या या वागणुकीची मोठी किंमत जगाला भोगावी लागणार असल्याचं चीननं म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती