अमेरिकेकडून भारतीयांना फटका, ऑनलाइन क्लास सुरु झालेल्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द

मंगळवार, 7 जुलै 2020 (09:16 IST)
विद्यार्थी व्हिसावर अमिरेकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. करोना संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त ऑनलाइन होत आहे अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या लाखो भारतीयांना लवकरच भारतात परतावं लागू शकतं. इमिग्रेशन आणि सीमा शुल्क अंमलबजावणीकडून यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे. 
 
अमेरिकेत विद्यापीठाने ऑनलाइन शिक्षणास सुरुवात केली असेल तर परदेशातील विद्यार्थ्यांना देश सोडावा लागणार आहे अन्यथा त्यांना हद्दपार केलं जाईल असं आदेशात सागंण्यात आलं आहे. अमेरिकेत अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी व्हिसावर प्रवेश दिला जाणार नाही.
 
विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस सुरु झाल्यामुळे त्यांचं अमेरिकेत वास्तव्य करण्याचे कारण नसल्याचं म्हटले जात आहे. या ‍निर्णयाचा अनेक भारतीय विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती