आश्चर्यजनक बातमी ! 37 वर्षीय पुरुषाने दिला मुलाला जन्म

रविवार, 26 डिसेंबर 2021 (18:02 IST)
अमेरिकेत एका ट्रान्सजेंडर पुरुषाने मुलाला जन्म देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या घटनेनंतर जेव्हा लोकांनी या व्यक्तीला मुलाचा बाप म्हणण्याऐवजी 'आई' म्हणून हाक मारली तेव्हा या व्यक्तीला राग तर आलाच, पण दुख ही झाला. मुलाच्या जन्मानंतर हा ट्रान्सजेंडर म्हणाला- मी आता पुरुष आहे आणि मी मुलाला जन्म दिला आहे. पण मला वाटतं तुम्ही आता  गर्भधारणा स्त्रीशी करणं थांबवायला हवं.
 
37 वर्षीय बेनेट कास्पर विल्यम्स हे अमेरिकेतील लॉस एंजेलिसचे रहिवासी आहेत. ते  एक ट्रान्सजेंडर पुरुष आहे. बेनेटने सांगितले की, सात वर्षांपूर्वी ते  एक महिला होते . मात्र शस्त्रक्रिया करून 3 लाखांहून अधिक खर्च करून त्यांनी स्तनावर उपचार करून घेतले. परंतु मुलाला जन्म देणाऱ्या महिलेच्या अंगात कोणताही बदल करण्यात आला नाही. बेनेट सांगतात की, त्यांना मातृत्वाचा आनंद घ्यायचा होता म्हणून त्याने हे केले.
2017 मध्ये बेनेट मलिक नावाच्या व्यक्तीला भेटले होते. दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर दोघांनीही आपल्या कुटुंबाला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, बेनेटने गेल्या वर्षी मुलाला हडसनला जन्म दिला. बेनेटने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या त्यावेळचा एक विचित्र अनुभव सांगितला आहे, तसेच त्याचा राग देखील व्यक्त केला आहे.
 
बेनेट सांगतात की, जेव्हा तिने आपल्या मुलाला जन्म दिला तेव्हा हॉस्पिटलमधील लोक तिला वडिलांऐवजी मुलाची आई म्हणून चिडवू लागले. बेनेट सांगतात की, त्याला याचा खूप धक्का बसला आहे. कारण त्यांचा असा विश्वास आहे की मातृत्वाची भावना केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही असू शकते. बेनेट म्हणतात की मातृत्व आणि स्त्रीत्व यात फरक आहे. या लोकांना कळत नाही. लोकांच्या मनात एक गोष्ट रुजली आहे की या जगात फक्त महिलाच आई होऊ शकतात आणि तिच्यात मातृत्वाची भावना निर्माण होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती