पुण्यातील कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात;आठ महिलांचा मृत्यू, 21 जखमी

सोमवार, 11 ऑगस्ट 2025 (17:56 IST)
खेड तालुक्यातील पाईट गावातून महिलांना श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी  घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाचा अपघात होऊन अपघातात 8 महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला तर 21 महिला भाविक जखमी झाल्या.
ALSO READ: पुण्यात पाच नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
सदर अपघात दुपारी 1 वाजेच्या सुमारास पाईट गावातील 30-35 महिला श्रावणी सोमवार निमित्त 11 ऑगस्ट रोजी सकाळी पाईट गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे दर्शनासाठी पिकअपने वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून वाहन थेट दरीत कोसळून झाला.
ALSO READ: पुणे जिल्ह्यात 3 नवीन महानगरपालिका स्थापन होणार-अजित पवार
वाहनावरील नियंत्रण चालकाने गमावल्यावर वाहन 5 ते 6 वेळा पालटून 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळले. हा मार्ग अतिशय रहदारीचा आहे. खेड तालुक्यातील अनेक भाविक पाईट गावातून श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जात असतात.
ALSO READ: पुण्यातील डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसला आग
 पिकअप पलटी झाल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या भाविकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढून खासगी वाहनातून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र सात महिलांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
Edited By - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती