नासाने जगातील सर्वात मोठी दुर्बीण जेम्स वेब (James Webb)अंतराळात प्रक्षेपित केली

शनिवार, 25 डिसेंबर 2021 (20:47 IST)
NASA ने जगातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली इन्फ्रारेड टेलिस्कोप लॉन्च केली आहे - जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, हबल टेलिस्कोपचा उत्तराधिकारी मानला जातो . फ्रेंच गयाना येथील कौरो स्पेसपोर्टवरून एरियन रॉकेटद्वारे ही वेधशाळा अवकाशात पाठवण्यात आली आहे. पुढील दशकातील ही सर्वात महत्त्वाची अवकाश विज्ञान वेधशाळा असेल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.
 
ट्विट करून प्रक्षेपणाची माहिती देताना नासाने सांगितले की, जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या मोहिमेमुळे आम्हाला आता माहित असलेल्या अवकाशाबद्दलची आमची समज बदलेल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती