मुर्तिजापूरात गायी मारून त्यांचे मांस विकल्याप्रकरणी तिघांना अटक
सोमवार, 11 ऑगस्ट 2025 (18:55 IST)
गुप्त माहितीच्या आधारे अकोल्या जवळ मूर्तिजापूर शहर पोलिसांनी परदेसीपुरा परिसरात छापा टाकला आणि गायींची कत्तल करून त्यांचे मांस विकणाऱ्या तीन आरोपींना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई ऑपरेशन प्रहार अंतर्गत करण्यात आली. पोलिस हवालदार सुरेश पांडे हे पोलिस पथकासोबत पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका विश्वासार्ह खबऱ्याकडून माहिती मिळाली की काही जण राहत्या घरात मोकळ्या जागेत गायीची कत्तल करून त्याचे मांस विकत आहे.
या माहितीच्या आधारे, पोलिस पथकाने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. हे सर्वजण परदेशीपुरा,मुर्तिजापूरातील रहिवासी आहे.
छाप्यादरम्यान पोलिसांनी 24,000रुपये किमतीचे सुमारे 80 किलो गोमांस,300 रुपये किमतीचे तीन लोखंडी धारदार चाकू, 150 रुपये किमतीचे तीन लाकडी लाकडे, 300 रुपये किमतीचे एक लोखंडी वजन आणि काटा, अशा एकूण 24,750 रुपयांच्या वस्तू जप्त केल्या.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संबंधित कलमांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.