अल्जिरिया : आल्या परीक्षा, देशात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

गुरूवार, 21 जून 2018 (15:34 IST)
अल्जिरियात शाळाशाळांमधून डिप्लोमाच्या परीक्षा सुरू झाल्यात. त्यामुळे या काळात कॉपी रोखण्यासाठी चक्क देशांतर्गत इंटरनेट सेवाच पूर्णपणे बंद केली आहे. परीक्षेदेरम्यान केली जाणारी कॉपी तसेच, परीक्षेत येणारा अडथळा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. 
 
यापुढे परीक्षा संपेपर्यंत हा निर्णय कायम एसेल. अल्जिरीयात सुमारे ७ लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी इंटरनेट ब्लॅकआऊट कायम राहिल. या परीक्षा सोमवार पर्यंत सुरू असतील. टेलिकॉम असोशिएशन  AOTA चे अध्यक्ष अली कहलाने यांनी सांगितले की, ऑपरेटर्सनी सरकारचे आदेश पाळणे बंधनकारक आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती