ब्रिटनच्या राजघराण्यात ऐतिहासिक 'समलैंगिक' विवाह

मंगळवार, 19 जून 2018 (17:29 IST)
ब्रिटनच्या राजघराण्यात आणखी एक ऐतिहासिक विवाह होणार आहे. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ व्दितीयचे चुलत भाऊ लॉर्ड इवार माऊंटबॅटन आपला समलैंगिक साथीदार जेम्स कोयलसोबत लग्न करणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या राजघराण्यात पहिल्यांदाच असा समलैंगिक विवाह अधिकृतपणे होत आहे. हा विवाह मोठ्या धडाक्यात होणार नाहीये. फार खाजगी स्वरूपात हा विवाह होणार आहे.   
 
लॉर्ड इवार माऊंटबॅटन यांनी साधारण 2 वर्षांपूर्वी 2016 मध्ये ते समलैंगिक असल्याची जाहीर घोषणा केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे 24 वर्षांपूर्वी त्यांनी पेनी नावाच्या महिलेशी लग्न केले होते. नंतर 2010 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. कारण त्या लग्नात त्यांना काहीच सहज वाटत नव्हतं. 
 
घटस्फोटांनंतर माऊंटबॅटन यांनी सांगितले होते की, 'मला आनंद आहे की, माझी समस्या माझ्या पत्नीने जाणली आणि मला मदत केली'. पेनी आणि माऊंटबॅटन हे आजही चांगले मित्र आहेत. पेनी माऊंटबॅटन यांच्या या समलैंगिक लग्नातही सहभागी होणार आहे. पहिल्या लग्नातून त्यांना तीन अपत्ये आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती