काँगोमध्ये बोट उलटून एक दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी होते
मिळालेल्या माहितीनुसार काँगोच्या वायव्य विषुववृत्त प्रांतात एक दुःखद अपघात झाला. येथे मोटार बोट उलटल्याने किमान ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी होते. सध्या अपघाताचे कारण काय होते हे स्पष्ट झालेले नाही. तथापि, सरकारी माध्यमांनी यासाठी 'रात्रीच्या वेळी बोटीत जास्त गर्दी आणि नेव्हिगेशन' याला जबाबदार धरले आहे. यापूर्वीही असे अपघात घडले आहे.