मिळालेल्या माहितीनुसार ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांना २०२२ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्तेत राहण्यासाठी बंडखोरीचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवले. न्यायालयाच्या ५ पैकी ४ न्यायाधीशांनी त्यांना पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आणि २७ वर्षे ३ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ब्राझीलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षाला बंडखोरीच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले आहे. सध्या ब्राझीलियामध्ये नजरकैदेत असलेले बोल्सोनारो यांनी नेहमीच हे आरोप फेटाळले आहे. त्यांना या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाकडे निर्णय प्रकाशित करण्यासाठी ६० दिवस आहे, त्यानंतर बोल्सोनारो यांचे वकील ५ दिवसांत स्पष्टीकरणासाठी अर्ज दाखल करू शकतात.