उडत्या विमानात उड्डाणाचा दरवाजा उघडत प्रवाशाने केले महिला क्रूसोबत गैरवर्तन

शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (18:18 IST)
अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये केबिन क्रूसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर उडत्या उड्डाणात प्रवाशाने विमानाचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला.
 
न्यूयॉर्क पोस्टच्यावृत्तानुसार, न्यू जर्सीचा 26 वर्षीय तरुण अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानातून सिएटलहुन डलासला जात असताना विमान आकाशाच्या मध्यभागी असताना तो विचित्र वागू लागला. त्याने आपली शर्ट काढली आणि फ्लाईट अटेंडेडला प्रपोज केले. एवढेच नव्हे  तर त्याने  महिला केबिन क्रू शी शारीरिक संबंध स्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली. 

या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यात हा तरुण आरडाओरड करताना दिसत आहे मी बुद्धिमान आहे, मी शहाणा आहे असं तो ओरडत आहे. त्याने स्वतःला बाथरूमच्या आत स्वतःला कोंडून घेतलं आहे. 

प्रकरण वाढत असताना पाहून केबिन क्रू आणि प्रवाशी पुढे आले त्यांनी तरुणावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला ताब्यात घेत त्याचे हात पाय बांधले आणि त्याला विमान उतरल्यावर विमानतळावर नेण्यात आले. त्याने विमानतळावर देखील आपले असभ्यवर्तन सुरु ठेवले त्याने डिटेन्शन कक्षाचे काच फोडले. 
 
उड्डाण कर्मचाऱ्यांमध्ये हस्तक्षेप करणे आणि विमानाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणे या आरोपांव्यतिरिक्त, एका अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा आरोप करण्यात आले आहे. 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती