व्हाइट हाउसच्या ट्विटर हँडलने भारतातील ट्विटर अकाउंट्स अनफॉलो केले

बुधवार, 29 एप्रिल 2020 (16:35 IST)
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतातील ट्विटर अकाउंट्सना फॉलो करण्यात आले होते. पण, आता अचानक काही दिवसांमध्येच व्हाइट हाउसने मोदींसह सर्व भारतीय ट्विटर अकाउंट्सना अनफॉलो केले आहे.
 
भारताने करोना विरोधातील लढ्यासाठी अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, 11 एप्रिल रोजी व्हाइट हाउसच्या ट्विटर हँडलने अनेक भारतीय ट्विटर हँडल फॉलो केले. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, आणि अमेरिकेतील भारतीय दूतावास यांच्या ट्विटर हँडलचा समावेश होता. यासोबत व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून फॉलो केले जाणारे मोदी जगातील पहिले नेते ठरले होते.
 
पण, फॉलो केल्यानंतर तीन आठवड्यांमध्येच आता अचानक व्हाइट हाउसने सर्व भारतीय ट्विटर अकाउंट्सना अनफॉलो केल्याचं समोर आलं आहे. आता केवळ १३ ट्विटर हँडल्सना व्हाइट हाउस फॉलो करत आहे. व्हाइट हाउसने अचानकपणे भारतीय हँडल्स अनफॉलो का केले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती