ऐन रमझानच्या महिन्यात पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

सोमवार, 27 एप्रिल 2020 (18:37 IST)
रमझानच्या महिन्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू शकतो, अशी शक्यता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आरोग्य विषयक सचिव डॉ. जाफर मिर्झा यांनी व्यक्त केली आहे.
 
पाकिस्तान सरकारनं रमझानच्या महिन्यात मशिदी बंद ठेवण्याचा आणि सामूहिक नमाज न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, मुस्लीम संघटनांच्या मागणीमुळे सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
 
मिर्झा यांनी म्हटलं, "रमझानच्या काळात दुकानांमध्ये गर्दी वाढते. शनिवारी मला गर्दी झालेली पाहायला मिळाली. लोकांनी आता याकडे गांभीर्यानं पाहायला हवं. नाहीतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल."
 
शनिवारी पाकिस्तानात एका ENT सर्जनचा मृत्यू झाल्यामुळे देशातील डॉक्टरांच्या चितेंत वाढ झाली आहे.
 
पाकिस्तानात कोरोनाचे आतापर्यंत 12,500 रुग्ण आढळले असून 260 जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृत आकडेवारीतून दिसत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती