३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

शनिवार, 11 एप्रिल 2020 (15:30 IST)
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रोखण्यासाठी गरज आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत मागणी केली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळल्यामुळे लाॅकडाऊन वाढविण्याची विनंती, करण्यात आल्याची माहिती  सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
 
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबाबत संभ्रम आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या वाढत राहिली आणि लॉकडाऊन उठविण्यात आले तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची गरज आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउन वाढवण्याची मागणी केली आहे. तशी आमची तयारी आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीतील परिस्थितीची माहिती दिली. त्यांनीही लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती