वाशिंग्टन- अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मलेरियावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधांच्या दुष्परिणामांकडे इशारा दिला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की कोविड 19 सारख्या आजारासाठी हे औषध फायदेशीर आहे. पण या औषधाने हृदयरोग संबंधित गंभीर प्राणघातक समस्या उद्धभवू शकतात.
एफडीएने औषध सुरक्षा संवादात सांगितले की कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत औषध वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ते म्हणाले की औषधांशी संबंधित या जोखमीचा आधीपासूनच उल्लेख आहे, तरी आरोग्यसेवा कर्मचार्यांनी यांकडे बारकाईने लक्ष दिल्यास यावर नियंत्रण करता येऊ शकतं.