Hydroxychloroquine म्हणजे काय, जाणून घ्या फायदे आणि नुकसान

बुधवार, 22 एप्रिल 2020 (13:24 IST)
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध अँटी मलेरियाचे क्लोरोक्वीन औषधापेक्षा जरा वेगळे आहे. हे एका टॅबलेटच्या रूपात असते. जे संधिवात सारख्या रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते. पण सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीला बघता कोरोनाच्या संरक्षणातही ह्या औषधींचा वापर केला जात आहे, अशी माहिती मिळत आहे. 
 
खरं तर या औषधाच्या वापर करण्यासाठीची मागणी 21 मार्च रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. कोरोना पासून बचाव करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन -अझिथ्रोमायसिन या औषधांचं मिश्रण करून वापरण्याची मागणी केली तेव्हा तसेच या बद्दल ट्विट करून त्यांनी या बाबतची माहिती दिली, त्या नंतर हे औषध वापरण्यात येऊ लागले. अमेरिकेत, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध वाढत्या कोरोनाच्या संकटावर रामबाण उपाय म्हणून काम करीत आहे. या साठी अमेरिकेकडून या मलेरियाच्या औषधाची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. 
 
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर - 
संशोधकांचा असा विश्वास आहे की या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन सह प्रोफिलॅक्सिसचा डोस घेतल्याने एसएआरएस-सी ओ व्ही -2 संसर्गाच्या उपचारांसाठी अमेरिकेत हायड्रॉक्सीक्लोरोक्लोवीनचे अनेक प्रयोग करण्याचे नियोजित आहे. एका शोधानुसार फक्त हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन किंवा अजिथ्रोमायसिनला एकेक घेत किंवा दोन्ही एकत्र घेतल्याने वरच्या श्वसन संसर्गामध्ये एसएआरएस - कोव्ही-2 आरएनए कमी होत असताना आढळून आलं.
 
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे दुष्प्रभाव (साइड इफेक्ट्स )
अमेरिकेच्या मॅडलिन प्लसच्या म्हणण्यानुसार, कुठल्याही लक्षणाशिवाय हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर योग्य नाही. या औषधाचे काही दुष्परिणाम देखील आहेत. याच्या दुष्परिणामामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, भूक न लागणे, मळमळ होणे, अतिसार, ओटीपोटात वेदना होणे, उलट्या आणि त्वचेवरील पुरळ यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, या औषधाचे जास्त सेवन केल्याने चक्कर देखील येऊ शकतात किंवा रुग्ण अशक्त होऊ शकतो. 
 
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे प्रभाव 
या औषधाचा सार्स-कोव्ह -2 वर विशेष प्रभाव आहे. ह्याच विषाणूंमुळे कोविड- 2 होतो. या विषाणूसाठी हे रामबाण आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती