कंकणाकृती सूर्य ग्रहण 26 डिसेंबरला, जाणून घ्या ग्रहण काळ
बुधवार, 25 डिसेंबर 2019 (10:15 IST)
ग्रहण म्हणजे अवकाशात एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूला लपवते. म्हणजे एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूला झाकते त्यावेळी त्या वस्तूला ग्रहण लागले असे म्हणतात.
सूर्यग्रहण
जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अमावस्या ही तिथी असते. म्हणजेच सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होते. पृथ्वीच्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते अशाच भागांवरून सूर्यग्रहण दिसते. जशी सावली पुढे पुढे सरकत जाते तसे संबंधित भागांवर त्या त्या वेळी सूर्यग्रहण दिसते.
कंकणाकृती सूर्यग्रहण :-
पृथ्वी भोवतालाचे चंद्र कक्ष लांब आणि वर्तुळाकार असते. त्यामुळे चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर बदलत असते. परिणामस्वरूप पृथ्वी वरून दिसणाऱ्या चंद्रेच्या आकारात परिवर्तन होते. चंद्राचे पृथ्वी पासूनचे अंतर जास्त असल्याने चंद्र, पृथ्वी, आणि सूर्य एक रेषेत आल्याने चंद्राचे आकार (कोणीयमाप) सूर्यापेक्षा लहान असल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. त्यामुळे चंद्रामागे झाकलेल्या सूर्याचा आकार बांगडी सारखा दिसतो. ह्या स्थितीला कंकणाकृती म्हणतात आणि ह्या ग्रहणाला कंकणाकृती सूर्य ग्रहण.
सूर्य ग्रहण कधीही साध्या डोळ्याने बघणे हानीप्रद असते. बघायचे असल्यास चष्मा लावून किंव्हा विशिष्ट प्रकाराच्या दुर्बीणने किंवा पडद्यावर त्याचे प्रतिबिंब बघितलेले चालते नाही तर डोळ्यांना इजा होऊ शकते.
सूर्य ग्रहणाच्या वेळी काही कार्य करणे वर्जित असते.
देऊळात प्रवेश वर्जित असते.
मूर्तीस स्पर्श निषिद्ध आहे.
अन्न ग्रहण करणे निषिद्ध आहे.
सुतक काळ ग्रहणाचा 12 तास आधीच लागल्याने रात्रीच देऊळ बंद केले जातील.
ह्या वर्षी हे ग्रहण 26 डिसेंबर रोजी आल्याने 25 डिसेंबर रोजीच देऊळाचे कपाट बंद केले जातील.
.
सुतक काळ :-
सुतक काळ 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटावर सुरु होईल
आणि 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 57 मिनिटावर संपेल
आंशिक सूर्य ग्रहण सकाळी 8.17 मिनिटांनी सुरु होईल आणि सकाळी 10.57 वाजता संपेल.