घरात या प्रकारे स्थापित करा देवी अन्नपूर्णा

शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (12:00 IST)
घरात सुख, शांती, समाधान नाहीसे झाले असून समस्यांने वेधत आहे. असे वाटत असल्यास एक सोपा उपाय करुन बघात येऊ शकतो. याने घरात सुख, शांती, समाधान नांदेल.
 
आपल्या देवघरात अन्नपुर्णा असतेच. ह्या अन्नपूर्णेला मान दिल्यास ही चांगले फळ देते. 
 
अन्नपूर्णा नेहमी छोट्या ताटलीत तांदूळ किंव्हा गहू ठेवून त्यावर स्थापित केली पाहिजे. दर रोज नियामाने देवीची पूजा करावी. पूजा करताना दर रोज त्या ताटलीतले तांदूळ किंवा गहू दर रोजच्या वापरणीतले धान्यात मिसळावे. त्यातून काही अंश पक्ष्यांना घालावेत. अशा प्रकारे दर रोज ते तांदूळ किंवा गहू बदलायला हवे. 
 
असे केल्यास अन्नपूर्णेची वास्तूवर अखंड कृपा राहाते. घरात सुख, समाधान, शांती नांदते. लक्ष्मी देवीची कृपादृष्टी नेहमी आपल्यावर राहते. लक्ष्मी पण घरात नांदते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती