मार्गशीर्ष महिन्यात करा शंखाची पूजा, जाणून घ्या पूजा विधी, मंत्र

बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (10:48 IST)
धर्म शास्त्रानुसार सुख-सौभाग्यात वृद्धीसाठी आपल्या घरात शंख स्थापित करावं. तसेच अगहन (मार्गशीर्ष) महिन्यात शंख पूजन करण्याचं विशेष महत्त्व आहे. या महिन्यात कोणत्याही प्रकाराच्या शंखाला प्रभू श्रीकृष्णाचे पंचजन्य शंख मानून पूजन केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
विष्णू पुराणानुसार समुद्र मंथन दरम्यान प्राप्त झालेल्या 14 रत्नांपैकी एक रत्न होतं शंख. दररोज घरात शंख पूजन केल्याने जीवनात कधीही धन-धान्य, आणि पैशांची कमी भासत नाही.
 
या व्यतिरिक्त दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे. या शंखाची पूजा केल्याशिवाय लक्ष्मी आराधना अपुरी मानली जाते. मार्गशीर्ष महिन्यात विशेष करून लक्ष्मी पूजन करताना दक्षिणावर्ती शंखाची पूजा अवश्य करावी. 
 
शंख पूजन सामुग्री :
 
* शंख
* कुंकू
* अक्षता
* जल पात्र
* कच्चं दूध
* एक स्वच्छ कपडा
* एक तांब्याच्या किंवा चांदीचा लोटा
* पांढरे फुलं
* अत्तर
* कापूर
* केशर
* उदबत्ती
* दिवा लावण्यासाठी शुद्ध तूप
* नैवेद्य
* चांदीचं वर्क
 
या प्रकारे करा पूजा-
 
* सकाळी उठून अंघोळ करून स्वच्छ धुतलेले वस्त्र धारण करावे.
 
* पाटावर एका पात्रात शंख ठेवावे.
 
* आता कच्च्या दूध आणि पाण्याने स्नान करवावे.
 
* आता स्वच्छ कपड्याने पुसून त्यावर इच्छेप्रमाणे चांदीचं वर्क चढवावे.
 
* नंतर तुपाचा दिवा लावून उदबत्ती लावावी.
 
* आता शंखावर दूध-केशर मिश्रित घोळाने श्री एकाक्षरी मंत्र लिहून शंख चांदी किंवा तांब्याच्या कळश किंवा पात्रावर स्थापित करावे.
 
* आता या मंत्राचा उच्चार करत शंख पूजन करत कुंकू, अक्षता, अत्तर आणि पांढरे फुलं अर्पित करावे.
 
* त्वं पुरा सागरोत्पन्न विष्णुना विधृत: करे।
निर्मित: सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोऽस्तु ते।
तव नादेन जीमूता वित्रसन्ति सुरासुरा:।
शशांकायुतदीप्ताभ पाञ्चजन्य नमोऽस्तु ते॥
 
* नैवेद्य दाखवावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती