Surya Grahan 2019: वर्षाचा दुसरा सूर्यग्रहण 2 जुलै रोजी, जाणून घ्या या ग्रहणाचे ज्योतिषी प्रभाव
सोमवार, 1 जुलै 2019 (15:31 IST)
Total Solar Eclipse,Surya Grahan july 2019: जुलै महिन्याच्या सुरुवातीत सूर्य ग्रहण लागणार आहे. 2 जुलै रोजी दुसरा ग्रहण लागणार आहे. हा सूर्यग्रहण पूर्ण सूर्यग्रहण असेल, जो किमान 4 तास 55 मिनिटापर्यंत राहणार आहे. ग्रहण 2 जुलै रात्री 11 वाजून 25 मिनिटापासून सुरू होईल जो 3 जुलैच्या सकाळी 3 वाजून 20 मिनिटापर्यंत राहील. सूर्यग्रहण रात्री असल्यामुळे भारतात दिसणार नाही.
सूर्यग्रहण कसा लागतो
वैज्ञानिक दृष्टीकोणाने बघितले तर जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध मध्ये चंद्र येतो तेव्हा अशा स्थितीत पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पडत नाही. यामुळेच सूर्य ग्रहण लागतो.
सूर्यग्रहण 2019 कुठे कुठे दिसणार आहे
2 जुलै रोजी लागणारा सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. हे पूर्ण सूर्य ग्रहण दक्षिणी प्रशांत महासागर आणि दक्षिणी अमेरिकेत दिसणार आहे. 2 जुलै रोजी सूर्यग्रहण न्यूझीलँडच्या तटावर दिसणार आहे. वर्षाचा तिसरा आणि शेवटचा सूर्यग्रहण डिसेंबरमध्ये दिसणार आहे.
ग्रहण दरम्यान काय सावधगिरी बाळगावी
- ग्रहणाच्या दरम्यान डोक्यावर तेल लावणे, भोजन करणे आणि बनवणे देखील वर्जित असते.
- ग्रहणाच्या दरम्यान वायूमंडळात बॅक्टिरीया आणि संक्रमणाचे प्रकोप तीव्र गतीने वाढून जातात. अशात भोजन केल्याने संक्रमण अधिक होण्याची शक्यता असते. म्हणून ग्रहण दरम्यान भोजन करण्यापासून बचाव करायला पाहिजे.
- ग्रहणदरम्यान नवरा बायको ने शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे. या दरम्यान जर गर्भ राहीला तर ती संतान विकलांग किंवा मानसिकरूपेण विक्षिप्त होऊ शकते.
- ग्रहणदरम्यान कुठलेही शुभ व नवीन कामाची सुरुवात नाही करायला पाहिजे.