काय सांगता श्रीरामाला एक बहीण होती...

सोमवार, 13 एप्रिल 2020 (18:21 IST)
आजवर आपल्याला श्रीरामाबद्दल आणि त्यांचा परिवाराबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे की हे 4 भाऊ होते. पण फार क्वचित लोकांना माहिती असणार की श्रीरामास ''शांता'' नावाची एक बहीण होती आणि ती सगळ्या भावांमध्ये सर्वात थोरली होती. ही कौशल्याची मुलगी असे. 
 
अशी आख्यायिका आहे की एकदा अंग देशाचे राजा रोमपद आणि त्यांची पत्नी वर्षीणी अयोध्येत आले होते. ह्यांना काहीही अपत्य नव्हती. संभाषणात राजा दशरथांना कळले की ह्यांना एकही अपत्य नाही. तेव्हा राजा दशरथ त्यांना म्हणाले की आपणास काळजी नसावी मी माझी मुलगी आपल्यास अपत्य म्हणून देईन. हे ऐकताच राजा रोमपद आणि राणी वर्षीणी प्रसन्न झाले. त्यांनी अती प्रेमाने शांताचा सांभाळ केला आणि योग्य पालक म्हणून आपले सगळं कर्तव्य पार पाडले.
 
एके दिवशी राजा रोमपद आपल्या मुली शांताशी वार्तालाप करीत असताना एक ब्राह्मण त्यांच्या दारी येऊन विनवणी करून लागले की पावसाळ्याचा दिवसात नांगरणी करून राज्याकडून मदत मिळावी. पण राजा आपल्या मुलीसोबत बोलण्यात गुंग असल्याने त्याने ब्राह्मणाची विनवणी एकलीच नाही. ब्राह्मणाला फार वाईट वाटले की राजाने आपल्या विनवणीला मान दिले नाही. त्याने ते राज्य सोडण्याचे निर्णय घेतले. ब्राह्मण देवराज इंद्राचा मोठा भक्त होता. आपल्या भक्ताची अशी अवस्था बघून इंद्राला फार वाईट वाटले आणि राजाचा राग आला. त्यांनी त्या राज्यात पाऊस पाडला नाही. पाऊस नसल्याने पिकाचे नुकसान होऊ लागले. पीक वाळू लागले. 
 
राज्यांवर आलेले हे संकट बघून राजा रोमपद ऋषिशृंग यांच्याकडे गेले आणि त्यांना उपाय विचारले. ऋषींनी त्यांना सांगितले की देवराज इंद्र कोपल्याने असे झालेले आहे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण यज्ञ करावे. इंद्रदेव प्रसन्न झाल्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. पीक चांगली आली धान्याचे कोठारघर भरले. राजा रोमपदांची कन्या शांता यांचा विवाह ऋषिशृंग यांसोबत झाला. ते आनंदाने राहू लागले. ऋषिशृंगानेच राजा दशरथाच्या पुत्र कामनेसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ केले होते. ज्या स्थळी हे यज्ञ केले ते स्थळ अयोध्येपासून 39 किमी पूर्व दिशेस होते. आजही त्यांचे आश्रम तेथे आहे. त्या स्थळी त्यांची आणि त्यांचा पत्नीचे समाधी स्थळ आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती