उपनयन संस्कारात जे अन्य विधी केल्या जातात (मेघाजनन) त्यासाठी बटू, अंतर्बाह्य पवित्र होऊन नवे जीवन सुरू करण्यास सिद्ध होऊन त्याचा बुद्धीस वाढ होते. पुढील आयुष्यात त्याने अग्नी आणि सूर्याची उपासना करून त्यांचा सम तेजस्वी बनावे अशी अपेक्षा बाळगली जाते. अश्या दृष्टीने उपनयन संस्कार हा एक महत्त्वाचा संस्कार आहे.
धर्मसिंधू ग्रंथात असे सांगितले आहे की प्रातःकाळी नक्षत्रे दिसत असता संध्या करणे हा उत्तम काळ आहे. नक्षत्रे अदृश्य होत असता मध्यमकाळ व सूर्योदयानंतरचा काळ कनिष्ठ होय. शास्त्रांमध्ये संध्या करण्यास तिन्ही काळ योग्य सांगितले आहे. मध्याह्न काळची संध्या दुपारी 2 ते संध्याकाळच्या आत करावी. संध्याकाळची संध्या सूर्यास्तापूर्वीच करावी. हा उत्तम काळ होय. सूर्यास्त झाल्यानंतरचा काळ हा मध्यम व नक्षत्रे दिसू लागल्यानंतरचा काळ कनिष्ठ असे. संध्या कमीत कमी प्रातःकाळी तरी करावी. संध्या करण्याचा मागे मोठं सामर्थ्य दडलेले आहे.