अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांनी पाठ‍ फिरवली, मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला

सोमवार, 30 मार्च 2020 (17:37 IST)
भारतात कोरना व्हायरसच्या महामारीला पूर्ण देश लढा देत आहे तर उत्तरप्रदेशाच्या बुलंदशहरात जाती आणि धर्म याहून वर माणुसकी बघायला मिळाली ज्याची चर्चा पूर्ण प्रदेशातच नव्हे तर देशात होत आहे. सर्व याची मिसाल देत आहे.
 
मिळालेल्या माहीतीनुसार उत्तरप्रदेशाच्या बुलंदशहराच्या आनंद विहार साठा निवासी रविशंकर कर्करोगाने पीडित होत आणि उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गरिबीमुळे कुटुंबासमोर समस्या येऊ लागल्या तर रविशंकर यांच्या मुलाने नातेवाइकांना फोन करून येण्यासाठी मदत मागितली परंतू लॉकडाऊनमुळे नातेवाइकांनी असमर्थता दर्शवली. यामुळे कुटुंबातील लोकं काळजीत पडले. परंतू याबद्दल कळल्यावर गावातील ग्राम प्रधान अफरोज बेगम यांच्या मुलगा जाहिद अली त्यांच्या घरी पोहचला आणि रविशंकर यांच्या मुलाला मदतीचं आश्वासन दिलं. जाहिद अली यांनी इतर लोकांना गोळा केला. यात जवळपास एक डझन मुस्लिम बांधव होते. 
 
आधी असमंजसाची स्थिती होती नंतर अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने केलं जाईल असा निर्णय घेऊन बाबू खां, जाहिद अली प्रधान, मोहम्मद इकराम इतर बांधवांनी अर्थीला खांदा दिला आणि मृतदेह काली नदी स्मशानात घाटात नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आलं. 
विशेष बाब म्हणजे त्यांच्या अंतिम प्रवासादरम्यान मुस्लिम तरुण 'राम नाम सत्य है...' देखील उच्चारत होते आणि स्मशानात देखील पूर्ण रीती-भातीसह अंत्यसंस्कार करण्यात आलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती