गुरु पौर्णिमेला या प्रकारे करा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पूजा

सोमवार, 7 जुलै 2025 (16:10 IST)
आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. तसेच हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येक जण हा आपल्या गुरुप्रती निष्ठावान असतो. व गुरूपौर्णिमा दिवशी मनोभावे गुरूंची पूजा करावी. म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो. गुरुपौर्णिमेला श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पूजा कशी करावी
जाणून घ्या.
ALSO READ: श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भक्तांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! Guru Purnima Wishes in Marathi
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पूजा
गुरूपौर्णिमा या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. व स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरात देवासमोर दिवा लावावा. व देवपूजा करावी यामुळे घर प्रसन्न होते. आता श्री गोंदवलेकर महाराज यांच्या फोटो स्वच्छ कापडाने पासून घ्यावा. व एका चौरंगावर स्वच्छ कापड टाकून त्यावर ठेवावा. चौरंगासमोर रांगोळी काढावी. रांगोळीवर गुलाल किंवा हळदकुंकू टाकावे किंवा तुम्ही रंग देखील भरू शकतात. आता आपल्याला सर्वात आधी गणपती पूजन करायचे आहे. त्यासाठी पूजा साहित्य खालील प्रमाणे आहे.

पूजा साहित्य-
हळद , कुंकू, अष्टगंध, अक्षदा, हारफूले, विड्याची पाने, खारीक, बदाम सुपारी, सुट्टे पैशे, पंचामृत, गुळखोबर, पाच फळे, नारळ, जानवे जोड, दिवा, उदबत्ती , कापूर, मोठे ताम्हण, पळी, अभिषेक पात्र, चौरंग, आसान, पूजेसाठी कापड, अत्तर, दूध, पाणी, नैवेद्यासाठी घट्ट दही

गणपती पूजन-
प्रथम आचमन-प्राणायाम करावे गणपतीची प्रार्थना करावी. श्री गोंदवलेकर महाराजांचा फोटो ठेवला आहे त्या चौरंगावर विड्याचे पानं ठेऊन त्यावर पैसे ठेवावे व त्यावर सुपारी ठेवावी व त्यांची पंचोपचार पूजा करावी म्हणजेच फक्त हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षदा, फुल आणि गुळखोबरचा नैवेद्य अर्पण करावा यानंतर कलश पूजन, शंख पूजन, घंटी पूजन करावी व दीप पूजन करावे आता महाराजांच्या फोटोला सुंदर असा हार घालावा. आता आपण पुढील प्रमाणे पादुका पूजन करू या.
ALSO READ: Guru Purnima 2025 गुरु पौर्णिमा २०२५ कधी? तारीख, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
पादुका पूजन-
सर्व प्रथम चौरंगावर महाराजांच्या पादुका ठेवाव्या व नमस्कार करावा. पादुका घेऊन त्या मोठ्या ताम्हणात ठेवाव्या. व पाद्यपूजन करावे पादुकांवर एक पळी जल अर्पण करावे त्यानंतर अर्घ्य प्रदान करावे मग परत जल अर्पण करावे. तसेच पंचामृत अर्पण करावे आता यानंतर गंधाचे जल अर्पण करावे. पादुकांवर गंध, अक्षद, फुल अर्पण करावे आणि पंचामृताचा नैवेद्य करावा. त्यानंतर पादुकांवर जल किंवा दूध अर्पण करून अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर पादुकांवर अत्तर अर्पण करावे आता पादुका स्वच्छ कपड्याने पुसून चौरंगावर ठेवाव्या. पादुकांना गंध, अक्षद,  हार फुल अर्पण करावे. धूप दीप ओवाळून मग महाराजांना घट्ट दही याचा नैवेद्य दाखवावा कारण महाराजांना घट्ट दही अत्यंत प्रिय होते. आता नारळ आणि पाच फळे अर्पण करावे. तसेच खालील मंत्राचा जप करावा.

गुरु मंत्र: "गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः."
श्रीराम तारक मंत्र: "ॐ श्री रामाय नमः"
किमान १०८ वेळा जपावे.

आता पूजा झाल्यानंतर ''श्री राम जय राम जय जय राम'' जप करावा. व आरती करावी या नंतर प्रदक्षणा आणि क्षमा प्रार्थना करावी. व सर्वांना प्रसाद वाटावा.
ALSO READ: गुरु पौर्णिमेला या प्रकारे करा शेगावातील गजानन महाराज यांचे पूजन
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती