श्री समर्थ रामदास स्वामी भक्तांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! Guru Purnima Wishes in Marathi
मंगळवार, 8 जुलै 2025 (13:06 IST)
श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जीवन आणि शिकवणींनी प्रेरित होऊन गुरुपौर्णिमा निमित्त त्यांच्या भक्तांना तुम्ही हे शुभेच्छा संदेश नक्कीच पाठवू शकतात. तसेच या शुभेच्छा श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या शिकवणीचे सार प्रतिबिंबित करतात, ज्यामध्ये भगवान रामाची भक्ती, दान आणि आध्यात्मिक शिस्तीवर भर दिला जातो.
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
मनाचे श्लोक, दासबोध यातून प्रापंचिक ज्ञान
आणि परमार्थिक मार्गाची दिशा देणारे
श्री समर्थ रामदास स्वामी यांना त्रिवार नमन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ALSO READ: Guru Purnima 2025 : कोणाला गुरु करावं ?
मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना धर्मता नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञानी, भक्तिमान आणि कर्मयोगी संतकवी
श्री समर्थ रामदास स्वामी यांना विनम्र अभिवादन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ALSO READ: गुरु पौर्णिमेला या प्रकारे करा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पूजा
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!